5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, 38 रुग्णांना झाला डेंग्यू…. मनसे नेते अमोल रिंढे यांनी हिवताप अधिकाऱ्यांची घेतली भेट.. डेंग्यूवर नियंत्रण आणण्याच्या दिल्या सूचना..

बुलढाणा ब्रेकिंग

जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, 38 रुग्णांना झाला डेंग्यू….

मनसे नेते अमोल रिंढे यांनी हिवताप अधिकाऱ्यांची घेतली भेट.. डेंग्यूवर नियंत्रण आणण्याच्या दिल्या सूचना..

93 रुग्ण डेंग्यू सदृश्य, रायपूर गावात डेंग्यूचा हाहाकार…

जिल्हा आरोग्य अधिकारी गिते यांचे पूर्णतः दुर्लक्ष….

अँकर
जुन महिन्यात डेंग्यूने तोंड वर काढले असून जिल्ह्यात 150 पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.. .. यामध्ये 38 रुग्णांना डेंग्यू झाला आहे त्याच्यावर विविध रुग्णाल्यात उपचार सुरु असून 93 रुग्ण डेंग्यू सदृश्य पुढे आले आहेत ही माहिती हिवताप अधिकारी शिवराज चव्हान यांनी दिली आहे…
तसे जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णाल्यात डेंग्यू ने ग्रासलेले असंख्य रुग्ण उपचार घेत असल्याची सूत्राकडून मिळाली आहे.. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूने हाहाकार केला आहे..
चिखली तालुक्यातील रायपूर या गावात 200 पेक्षा जास्त ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून अक्ख गाव भयभीत झाले आहे.. काल एकाचा मृत्यू सुद्धा झाला आहे त्यामुळे ग्रामस्थ
दहशतीत दिसून येत आहे..
मात्र रायपूर येथील रुग्णाचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती हिवताप अधिकार्यांनी दिली आहे ..
मात्र रायपूर गावात डेंग्यूेने थैमान घातले असून नागरिकाणी संपूर्ण एक दिवस कोरडा पाळन्याचे आवाहन प्रशस्सनाच्या वतीने करण्यात आले आहे.. डेंग्यू हा टायगर मच्छर चावल्याने होत असून त्याची साखळी तोडण्याचा प्रयत्न हिवताप खाते करीत आहे तसेच.. मनसे नेते अमोल रिंढे पाटील यांनी तातडीने  हिवताप अधिकारी व  कर्मचाऱ्यांची बैठक घेत डेंग्यू झपाठयने पसरतोय त्यावर तात्काल उपाय योजना करीत नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.. तसेच रुग्णाल्यात जाऊन डेंग्यू रुग्णांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली ..

या डेंग्यू विषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर देत ती माहिती नाझ्याकडे नसल्याचे सांगत हलगर्जी पणा दाखवला आहे.. एक महिन्यापासून रायपूर गावांत डेंग्यूने थैमान घातलेले असताना अद्याप पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही त्यामुळे रायपूर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे…

Related Articles

ताज्या बातम्या