15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

परभणी  व बीड प्रकरणी तसेच गृहमंत्री अमित शहा या तीनही प्रकरणाच्या निषेधार्थ मोताळा येथे निघाला भव्य जन आक्रोश मोर्चा…

परभणी  व बीड प्रकरणी तसेच गृहमंत्री अमित शहा या तीनही प्रकरणाच्या निषेधार्थ मोताळा येथे निघाला भव्य जन आक्रोश मोर्चा…

 

परभणी येथील पोलिसांच्या अमानुष मारहाणीत भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेतील मुख्य आरोपींना आणि सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांच्या वतीने आज मोताळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते! जयश्रीताई शेळके यांनी सहभागी होऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या मोर्चाला प्रचंड संख्येने महिला व पुरुष बांधवांनी उपस्थित राहत निषेध व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या