बुलढाणा फ्लॅश..
पोस्टाची एटीएम सेवा बंद होण्याच्या मार्गावर….!
गेल्या कित्येक महिन्यापासून जिल्ह्याच्या मुख्यालयी पोस्टाचे एटीएम बंद…!
एकेकाळी पोस्टची सेवा सर्वोत्कृष्ट असल्याचे समजले जात होते आणि आताच्या अत्याआधुनिक काळात पोस्ट ऑफिस मागे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे बुलढाणा येथील पोस्ट ऑफिस मधील एटीएम सेवा केंद्र
गेल्या महिन्याभरापासून बंद आहे त्यामुळे पोस्ट ऑफिस खात्याचे ग्राहक वैतागले आहेत याबाबत पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता पोस्टाची एटीएम सेवा ही वरूनच बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे पोस्टाची सेवेबद्दल जी विश्वासार्हता होती पोस्टाची सेवेबद्दल जी विश्वासार्हता होती ती कमी होताना दिसत आहे …
एटीएम कार्ड सुद्धा हे फक्त तीन महिन्यासाठी दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे तीन महिन्यानंतर पुन्हा एटीएम कार्ड बदलावे लागत असल्याने ग्राहकामध्ये रोज व्यक्त केला जात आहे पोस्टामध्ये असलेल्या खातेदारांनी एटीएम सेवा पूर्वत सुरू करावी व तसेच एटीएम कार्ड सुद्धा तात्काळ वितरित त करण्यात यावे अशी मागणी खातेदारांकडून केला जात आहे



