बुलढाणा..
*चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष यांचा अपघाती मृत्यू ..*
*मुंबईवरून चिखलीकडे परतताना कसारा घाटात रेल्वेतून पडून मृत्यू ..*
*डॉ सत्येंद्र भुसारीच्या अपघाती मृत्यूने काँग्रेसला जबर धक्का ..*
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काँग्रेसला जबर धक्का देणारी घटना घडली असून चिखली तालुका काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वेतून पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे .. मुंबईवरून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे .. भुसारी याना तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचार दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला .त्यांच्या अकस्मात निधनानं हळहळ व्यक्त होत असून चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे .. डॉ भुसारी यांच्या जाण्याने तर काँग्रेस पक्षाला मात्र जबर धक्का बसला आहे .



