बुलढाणा ब्रेकिंग
नांदुरा येथील पुरवठा निरीक्षक पुनम थोरात लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात*…
नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांना लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. राशनच्या दुकानावरील कारवाई थांबविण्यासाठी पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांनी लाच मागितली होती. आज एसबीच्या पथकाने सापळा रचून नांदुरा पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांना 16 हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पथक करीत आहे.



