23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

राष्ट्रपतींकडे नार्को टेस्टची मागणी; अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाईची मागणी….* *महाराष्ट्राची प्रतिमा वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्या – माजी मंत्री सुबोध सावजी यांचे आवाहन*

बुलढाणा ब्रेकिंग

*राष्ट्रपतींकडे नार्को टेस्टची मागणी; अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाईची मागणी….*

*महाराष्ट्राची प्रतिमा वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्या – माजी मंत्री सुबोध सावजी यांचे आवाहन*

माजी मंत्री सुबोध सावजी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लेखी पत्र देत अशोक खरात प्रकरणातील सर्व संबंधित मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी व इतर व्यक्तींची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी केली आहे… सावजी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, या प्रकरणात तासिक भागातील महाठक अशोक खरात याच्या संपर्कात आलेल्या काही मंत्री व अधिकाऱ्यांची नावे समोर येत असून या सर्वांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. नार्को टेस्ट केल्यास तपासाला दिशा मिळून सत्य लवकर समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असल्याची खंत व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “नार्को टेस्टमुळे तपास अधिक पारदर्शक होईल आणि जनतेसमोर वस्तुस्थिती येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्यातील संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, तसेच आवश्यक त्या सूचना देऊन या सर्वांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सावजी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
सुभोध सावजी (माजी मंत्री, बुलढाणा) – “अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे. सत्य बाहेर आणण्यासाठी संबंधित सर्वांची नार्को टेस्ट होणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींनी याबाबत तातडीने आदेश द्यावेत.”…

Related Articles

ताज्या बातम्या