23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्याच्या एस.बी. रसाळ व दत्ताभाऊ सिरसाट यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान गौरव पुरस्कार’..*

बुलढाणा

*बुलढाण्याच्या एस.बी. रसाळ व दत्ताभाऊ सिरसाट यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान गौरव पुरस्कार’..*

*नाशिकमध्ये भव्य समारंभात सन्मान; राज्यभरातून निवडलेल्या ७० कार्यकर्त्यांमध्ये बुलढाण्याची उल्लेखनीय कामगिरी..*


ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित भव्य समारंभात बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सर्पमित्र एस.बी. रसाळ आणि रायपूर येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताभाऊ सिरसाट यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने “शिवरायांना डोक्यावर न घेता, डोक्यात घ्या” या विषयावर जळगाव येथील शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील यांचे प्रभावी जाहीर व्याख्यान पार पडले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, मेडल तसेच मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, समाजकल्याण विभागाचे अध्यक्ष मदन बडे, निसर्गोपचार तज्ञ डॉ. रावसाहेब घोडेगाव, संभाजी ब्रिगेडचे महानगर शिवव्याख्याते प्रफुल्ल वाघ, पत्रकार जिजाजी दवंडे, चंद्रमणी पटाईत, आयटकचे राज्य सचिव राजीव देसले, छावा क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पांगरकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शिंदे, महिला विकास मंडळाच्या माजी व्यवस्थापिका सौ. निलीमा साठे, मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मंडळाचे सचिव रवींद्र कुमरे, नरेंद्र गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
एस.बी. रसाळ यांनी सर्पमित्र म्हणून अत्यंत धाडसी व समाजोपयोगी कार्य करताना मानवी वस्तीत आढळणारे विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर होत असून वन्यजीव संवर्धनात मोठे योगदान त्यांनी दिले आहे. तसेच ‘त्रिशिका प्राचीन कालीन नाणी व वस्तुसंग्रह’ या उपक्रमातून त्यांनी ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचेही काम केले आहे.
दत्ताभाऊ सिरसाट यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजप्रबोधन घडवून आणले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दोघांनाही या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील सुमारे ११०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी निवड समितीने केवळ ७० कार्यकर्त्यांची निवड केली असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील या दोघांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या मानात भर पडली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या