बुलढाणा ब्रेकिंग
*ठाणेदार संग्राम पाटील यांचा धडाकेबाज इशारा; शहरातील बेशिस्तीला लगाम – कुणाचीही गय नाही!*
बुलढाणा शहरात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार संग्राम पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही काळात वाढलेली बेशिस्ती, गुन्हेगारी आणि राजकीय दबावाखाली दबलेले प्रशासन याला आळा घालण्यासाठी त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात कर्कश आवाज करत बुलेटवर भरधाव वेगाने फिरणाऱ्या बेशिस्त स्वारांविरोधात नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आता संग्राम पाटील यांनी सूत्रे हातात घेताच अशा बेशिस्त चालकांवर थेट कारवाई सुरू केली असून शहरात पोलिसांची धाकदपटशा पुन्हा निर्माण होताना दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारीवरही कठोर नियंत्रण आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी राजकीय हस्तक्षेपाला सुद्धा ठामपणे नकार दिला आहे. बेशिस्तीला चाप, गुन्हेगारांना धडा – बुलढाण्यात ‘कडक’ पोलिसिंग सुरू!
या भूमिकेमुळे बुलढाणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून शहरात कायदा-सुव्यवस्था सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.



