बुलढाणा ब्रेकिंग
*“शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक बंद करा; इंधन टंचाई नसल्याचा दावा खोटा”*
*माजी राज्यमंत्री सुभोध सावजी यांचे मुख्यमंत्र्यांना आक्रमक पत्र; दोन दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी..*
राज्यात डिझेल-पेट्रोल टंचाई नसल्याचा सरकारचा दावा फोल असल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक पत्र पाठवले आहे. “शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, शेतीची कामे ठप्प आहेत आणि सरकार मात्र इंधन टंचाई नसल्याचे सांगत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला…. पत्रात सावजी यांनी म्हटले आहे की, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे अडकली आहेत. पूर्वी बैलजोडीवर शेती होत होती, मात्र आता ९० टक्के शेती ही डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांवर अवलंबून असल्याने इंधनाशिवाय शेती अशक्य झाली आहे. “मुख्यमंत्री कार्यालयात बसून टंचाई नसल्याचे सांगण्यापेक्षा पेट्रोल पंपांवर जाऊन वास्तव पाहावे,” असा टोला देखील त्यांनी लगावला. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून खत, बियाणे आणि मशागतीचा खर्च वाढला असताना इंधनासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले… तसेच, “जर इंधनाची कमतरता नसेल तर पेट्रोल पंपांवरील वाहनांच्या रांगा का लागल्या आहेत?” असा सवाल उपस्थित करत सरकारने दोन दिवसांत पुरेसा इंधन पुरवठा करावा, अन्यथा इंधन टंचाई असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी सावजी यांनी केली आहे….



