23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

आय सपोर्ट सोनम’चा बुलढाण्यातून एल्गार; समतेचे निळे वादळ संघटनेचा जंतर-मंतर आंदोलनाला जाहीर पाठिंबा!….* *”धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा”; नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर भाई अशांत वानखेडे यांचा घणाघात!*

बुलढाणा ब्रेकिंग*

*‘आय सपोर्ट सोनम’चा बुलढाण्यातून एल्गार; समतेचे निळे वादळ संघटनेचा जंतर-मंतर आंदोलनाला जाहीर पाठिंबा!….*

*“धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा”; नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर भाई अशांत वानखेडे यांचा घणाघात!*

दिल्लीतील जंतर-मंतरवर पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आता बुलढाण्यातूनही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. जिल्ह्यातील समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेने ‘आय सपोर्ट सोनम वांगचुक’ असे संबोधित करून  आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केली आहे….
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी पर्यावरण कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या १८ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असून विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कलाकार आणि विद्यार्थी संघटना सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेनेही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ‘आय सपोर्ट सोनम’चे फलक हातात घेत सोनम वांगचुक यांच्या लढ्याला समर्थन दर्शविले… यावेळी भाई अशांत वानखेडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि देशभरात गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही समतेचे निळे वादळ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. बुलढाण्यातून व्यक्त झालेला हा पाठिंबा आता राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या