भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बुलढाण्यात महामानव ग्रुपची भव्य मोटारसायकल रॅली..!
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड व लोकनियुक्त नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्याहस्ते रॅलीचे स्वागत
पाणी वाटपातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन..!
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पावन निमित्ताने दि. १ जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा शहरात महामानव ग्रुप व भीम अनुयायांच्या वतीने उत्स्फूर्त वातावरणात भव्य, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे स्वागत करण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड तसेच बुलढाणा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांनी उपस्थित राहून सामाजिक सलोखा, बंधुता व शांततेचा संदेश दिला.
यावेळी आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड व नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभ तसेच महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीमा कोरेगावचा ऐतिहासिक लढा हा शौर्य, स्वाभिमान, समता व अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक असून, या लढ्याने समाजाला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली आहे. ही प्रेरणा आजही समाजाला योग्य दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन आमदार गायकवाड यांनी यावेळी केले…!
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुण, नागरिक व भीम अनुयायांचे शिवसेनेच्या वतीने पाणी वाटप करून स्वागत करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व माणुसकीचे दर्शन घडले. शौर्य दिनाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कार्यक्रम शांततेत, शिस्तीत व उत्साहात पार पडल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी आयोजक तसेच सहभागी तरुणांचे विशेष कौतुक केले..!
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, नवनिर्वाचित नगरसेवक विजय जायभाये, बबलू मावतवाल, दीपक सोनुने, सतीश बरडे, सचिन गायकवाड, नयन शर्मा, माजी आरोग्य सभापती आशिष जाधव, अशोक इंगळे, योगेश परसे, सागर घट्टे, नंदु जाधव, महामानव ग्रुपचे सुमित गायकवाड, शुभम खरे, मल्हारी गायकवाड, शेख जावेद, बाबा शेख, विजय काळवाघे, शुभम चवरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, भीम अनुयायी, नागरिक तसेच माता–भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने बुलढाणा शहरातून समता, बंधुता, संविधान, सामाजिक एकोपा व शांततेचा प्रभावी संदेश देण्यात आला असून, ही भव्य मोटारसायकल रॅली समाजाला प्रेरणा देणारी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली….!



