3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

महिलांसाठी बुलढाण्यात प्रसाधन गृह उभारावे…. शिवाजी हायस्कूल समोरील शौचालयाचे उद्घाटन त्वरित करावे.!… रमाई ब्रिगेड आणि आझाद हिंद महिला संघटनेचा आंदोलनाचा इशारा….

महिलांसाठी बुलढाण्यात प्रसाधन गृह उभारावे….

शिवाजी हायस्कूल समोरील शौचालयाचे उद्घाटन त्वरित करावे.!…

रमाई ब्रिगेड आणि आझाद हिंद महिला संघटनेचा आंदोलनाचा इशारा….

बुलढाणा:
बुलढाणा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुपूजा तू गायकवाड यांच्यासह 15 महिला नगरसेवक आहेत असे असताना महिलांसाठी शहरांमध्ये प्रसाधनगृह नसून त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
करिता नगराध्यक्षांचा बंगला नंतर प्रथम महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करावे अशी मागणी आझाद हिंद महिला संघटना रमाई ब्रिगेड मातृत्व रणरागिणी संघटना वारकरी महिला संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये शहर व परिसरातील महिला,मुली यांना शहरांमध्ये कुठेही प्रसाधनगृह स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची दैनंदिन कुचंबना होत आहे. ती सोडविण्यासाठी शहरातील सर्व प्रमुख प्रशासकीय कार्यालय, मुख्य बस स्टँड, शासकीय तथा खाजगी हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, बँक इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी आणि शहरातील सर्व सर्विस लाईन परिसरामध्ये त्वरित मोफत शौचालय आणि प्रसाधनगृह उभारण्यात यावे.
तर शिवाजी हायस्कूल समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या शौचालयाचे त्वरित उद्घाटन करण्यात यावे. सर्व प्रसाधन गृह, शौचालयांची दैनंदिन साफसफाई स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावे.
तोपर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडे असलेले मोबाईल टॉयलेट, बाथरूम प्रत्येक चौकात स्वच्छ करून तात्पुरते सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शहरातील विविध महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, उपायुक्त नगर विकास विभाग, उपविभागीय अधिकारी,मुख्य अधिकारी, आमदार संजयजी गायकवाड, नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांना निवेदनाच्या प्रती देत 7 जानेवारीला मागणी केली आहे.

सदर मागणीची त्वरित पूर्तता न झाल्यास रमाई ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, वारकरी धर्म परिषद आदी महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा सुद्धा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
निवेदनावर सुरेखाताई निकाळजे, प्रमिलाताई सुशीर,अनुसयाबाई पवार, आशाताई गायकवाड,भारतीताई अवचार, रमाताई गोरे, पंचफुलाबाई गवई, पूजा आहेर, अँड सतीशचंद्र रोठे पाटील, विजय साबळे पाटील, कमलाकर व्यवहारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या