*भारत विद्यालयाचा मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर विजयी !!!!*
गोंदिया येथे 16 व 17 जानेवारी रोजी झालेल्या 19 वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत विद्यालय बुलढाणा च्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले . ह्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागावर तर अंतिम सामन्यात मुंबई विभागावर दणदणीत विजय प्राप्त केला. फलंदाजी मध्ये नेहमीच उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक कर्णधार प्रणिता उगले व उपकर्णधार ऋतुजा पंडित, ह्यांना राहिया खान पठाण व वेदिका गवळी ह्यांची साथ मिळाली.
तर गोलंदाजी मध्ये वेगवान गोलंदाज मृणाल पडोळसे सोबत प्रतीक्षा खरे , प्रगती लोखंडे, तन्वी तायडे, कृष्णाली देशपांडे,भाग्यश्री भामद्रे, सायली साखरे यांनी धुरा सांभाळली. सानिका लहाने, स्नेहल सुरशे , सुजाता हिवाळे यांनी क्षेत्ररक्षण मध्ये चमकदार कामगिरी करत सुंदर झेल घेतले.
स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये राज्यस्तर विजेतेपदाचा चषक कर्णधार प्रणिता उगले व प्रशिक्षक श्री संजय देवल यांनी सर्व संघासमवेत स्वीकारला. संघातील सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
भारत विद्यालय बुलढाणा चे हे चौथे राज्यस्तरीय विजेतपद ठरले आहे.
“अजिंक्य, अभेद्य, अविरत” हे ब्रीदवाक्य असणाऱ्या भारत विद्यालय , बुलडाणा ने क्रिकेट विश्वावर असलेला दबदबा याही वर्षी कायम ठेवला आहे. 14 व 17 वर्षाखालील मुलांचा तर 19 वर्षाखालील मुलींचा लेदर बॉल क्रिकेट संघ राज्य स्तरावर पोहोचला होता . 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक देखील पटकाविला होता. मुलींचा टेनिस बॉल क्रिकेट संघ देखील राज्य स्तरावर पोहोचला आहे. भारत विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ सीमा आगाशे , सचिव अंगद आगाशे, प्राचार्य प्रल्हाद गायकवाड, उप प्राचार्य मोहन घोंघटे, पर्यवेक्षक नवल गवई, संघाचे प्रशिक्षक संजय देवल, प्रशिक्षक सावरमल शर्मा, अरुण सौभागे ,संदेश पाटील, रोहन शेटे, दिनेश गर्गे, अमोल बाळ यांनी तसेच जिल्हा क्रीडाधिकारी श्री बाळकृष्ण महानकर, क्रीडाधिकारी श्री संदीप केळे, श्री मनोज श्रीवास, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन चे प्रा.शरद इंगळे यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
19 वर्षाखालील मुलीचां क्रिकेट संघ:-
प्रणिता उगले( कर्णधार , यष्टीरक्षक ), ऋतुजा पंडित ( उप कर्णधार), राहीया खान पठाण, प्रगती लोखंडे, वेदिका गवळी, कृष्णाली देशपांडे, भाग्यश्री भामद्रे, सायली साखरे, सानिका लहाने, मृणाल पडोळसे,प्रतीक्षा खरे, सुजाता हिवाळे,स्नेहल सुरसे , तन्वी तायडे,
प्रशिक्षक संजय देवल, सावरमल शर्मा, रोहन शेटे.



