11.1 C
New York
Tuesday, April 21, 2026

Buy now

spot_img

भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच जास्त चर्चा…?*… *”हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है…!”* *बचेंगे तो और भी लढेंगे….! नगरपरिषद निवडणुकीत एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नारा.*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच जास्त चर्चा…?*…

*”हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है…!”*

*बचेंगे तो और भी लढेंगे….! नगरपरिषद निवडणुकीत एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नारा.*

2014 नंतर सलग प्रत्येक निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसने नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राज्यात नगराध्यक्ष पदाच्या 43 जागी तर नगरसेवक पदाच्या 1006 ठिकाणी यश संपादन करून काहीशी पराभवाची मालिका खंडित केलेली दिसत आहे… नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवलेली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात जवळपास अनेक सभा घेतल्याचा दावा केला आहे… अनेक ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर तर काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार दिले होते. यात काँग्रेसला विदर्भात सर्वात जास्त म्हणजे 23 जागी यश मिळालं आहे. हे यश कमी नसून काँग्रेसला मिळालेल यश हे वाखानण्याजोग आहे असं हर्षवर्धन सपकाळंनी मानत असताना त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवाय त्यांनी असंही म्हटलं आहे की, ” हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है….!” भाजप शिंदे सेना आणि अजित पवार ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, आम्हाला त्या पद्धतीने सत्ता मिळवायची नसून सत्याच्या आणि जनतेच्या मनातील सत्ता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकेतही अशाच प्रकारे सत्याच्या मार्गाने आम्ही जाऊ व “बचेंगे तो और भी लढेंगे…!” असही त्यांनी सूचक विधान केलेल आहे.
—————————–

Related Articles

ताज्या बातम्या