5.6 C
New York
Tuesday, April 21, 2026

Buy now

spot_img

मेहेकर नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल उबाठाने खेचला ; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मोठा धक्का… आ सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात किशोर गरोळे यांनी विजय खेचून आणला..

मेहेकर नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल उबाठाने खेचला ; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मोठा धक्का…

आ सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात किशोर गरोळे यांनी विजय खेचून आणला.

  • मेहेकर (जि. बुलढाणा)
    मेहेकर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. उबाठा गटाचे उमेदवार किशोर गारोळे यांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले असून, या निकालामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
    या निवडणुकीत सत्ताधारी शिंदेसेना व भाजप महायुतीने मोठ्या ताकदीने प्रचार केला होता. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः मेहेकरमध्ये येऊन सभा, बैठका, संपर्क दौरे घेत प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र मतदारांनी अपेक्षेच्या विरुद्ध निकाल देत उबाठा गटाला स्पष्ट कौल दिला.
    उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, बेरोजगारी, व्यापाऱ्यांचे प्रश्न, शहराचा रखडलेला विकास अशा मुद्द्यांवर उबाठाने आक्रमक भूमिका घेत मतदारांचा विश्वास संपादन केला.

  • विजयी उमेदवार किशोर गारोळे यांनी निकाल जाहीर होताच समर्थकांसह आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. यावेळी बोलताना किशोर गारोळे म्हणाले, “हा विजय जनतेचा आहे. मेहेकर शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा हेच आमचे प्राधान्य असेल.”
    या निकालामुळे महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. उबाठाने मेहेकरवर वर्चस्व मिळवत जिल्ह्यातील राजकारणात आपली ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या