10 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

भाजप युवा मोर्च्याचे आमरण उपोषण; भरवस्तीतील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी…* दोन दिवसात कारवाई करा अन्यथा मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्री  दालानासमोर आमरण उपोषण करू .. दिला इशारा….

बुलढाणा ब्रेकिंग

*भाजप युवा मोर्च्याचे आमरण उपोषण; भरवस्तीतील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी…*

दोन दिवसात कारवाई करा अन्यथा मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्री  दालानासमोर आमरण उपोषण करू .. दिला इशारा….

शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील अत्यंत भरवस्तीच्या भागात सुरु असलेले देशी दारूचे दुकान तात्काळ इतरत्र हलवण्यात यावे, या मागणीसाठी भाजप युवा मोर्च्याचे करण बेंडवाल यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
सदर दारूचे दुकान हे बुलढाणा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये स्थित असून तेथे निवासी परिसर, शाळा, महिला व लहान मुलांची मोठी वर्दळ असलेल्या भागात असल्याने परिसरातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. मद्यपींमुळे महिलांना त्रास, मुलींना छेडछाड, वादविवाद, भांडणे, अस्वच्छता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे…
भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष करण बेंडवाल यांनी याआधी जिल्हा दारूबंदी अधिकारी विभाग, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली होती. मात्र केवळ आश्वासनांपलीकडे काहीही न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
युवकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर दारूचे दुकान हलवण्याचा निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि *थेट मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल,* असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, उपोषणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही…

Related Articles

ताज्या बातम्या