बुलढाणा
*बुलढाणा आगारात १२ पर्यावरणपूरक ई-बससेसचे लोकार्पण..*
*आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ ; प्रवाशांना ई-बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन..*

अँकर
बुलढाणा आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १२ नव्या पर्यावरणपूरक ई-बससेसचे लोकार्पण करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या ई-बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “सर्व घटकांतील प्रवाशांनी या आधुनिक व पर्यावरणपूरक ई-बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले…. या कार्यक्रमास विभागीय नियंत्रक अधिकारी शुभांगी सिरसात, बुलढाणा आगार प्रमुख गाडलिंगज यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ई-बससेस या प्रदूषणमुक्त, इंधन बचत करणाऱ्या आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

या बसमुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन स्वच्छ हवा व हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे. तसेच प्रवाशांना शांत, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. बुलढाणा आगारातून सुरू झालेल्या या १२ ई-बससेस विविध मार्गांवर धावणार असून ग्रामीण व शहरी प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. शासनाच्या हरित धोरणाला अनुसरून एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचेही यावेळी वक्त्यांनी सांगितले.



