10.3 C
New York
Tuesday, April 21, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी ट्राफिक पोलिसांची विशेष मोहीम

बुलढाणा शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी ट्राफिक पोलिसांची विशेष मोहीम

बुलढाणा
बुलढाणा शहरात वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी ट्राफिक पोलिस विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना वाहने चालवण्याची शिस्त लागावी, नियमांचे पालन व्हावे आणि शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत व्हावी या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल असूनही अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. लाल सिग्नल असताना वाहने पुढे नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या थांबवणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत.
ही बाब लक्षात घेता ट्राफिक पोलिसांनी शहरातील जयस्तंभ चौक, चिखली रोड, खामगाव रोड, बसस्थानक परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आदी भागांत कडक तपासणी सुरू केली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्याचबरोबर समज देऊन जनजागृतीही केली जात आहे.
ट्राफिक पोलिसांच्या वतीने वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे की,
➡️ ट्राफिक सिग्नलप्रमाणेच वाहन चालवावे,
➡️ दुचाकीस्वारांनी हेल्मेट अनिवार्यपणे वापरावे,
➡️ चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावावा,
➡️ वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा,
➡️ चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये आणि वेगमर्यादेचे पालन करावे.
“वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत,” असे आवाहन ट्राफिक पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. शहरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि बुलढाणे शहर सुरक्षित व शिस्तबद्ध बनविण्यास हातभार लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेमुळे शहरातील वाहतुकीत शिस्त येईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या