बुलढाणा ब्रेकिंग
*“कर्जमाफीची फसवणूक; लाखो शेतकऱ्यांवर दोन लाखांहून अधिक कर्ज – जयश्री शेळके यांचा आरोप”..*
राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात फसवणूक असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री सुनील शेळके यांनी केला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी देऊन अनेक अटी-शर्ती लावण्यात आल्यामुळे लाखो शेतकरी अद्यापही कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जयश्री शेळके म्हणाल्या की, महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत केवळ दोन लाख रुपयांपर्यंतची मर्यादित कर्जमाफी देऊन सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. सरकारने आधी “सातबारा कोरा करू” असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात अटी-शर्ती घालून दिलेली ही कर्जमाफी अपुरी आणि फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला….
शेतकऱ्यांना खरी दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा राज्यातील शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने व्यापक निर्णय घेण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे….



